Kali Dharati (Tuzya Mazya Sansarala Aani Kay Hava) Lyrics


Movie-    Tujhya Majhay Sansarala
                Aani Kaay Hava?
Singers-  Ajay-Atul, Hrushikesh Ranade, 
                Yogita Godbole,Prajakta Ranade
Music-    Ajay-Atul
Lyrics-    Guru Thakur



Song- Kali Dharati




हे...

काळी धरती नांगरलेली आली र पेरणी
धावत ये र काळ्या मेघा किरपा आता करी हा ...
काळी धरती नांगरलेली आली र पेरणी
धावत ये र काळ्या मेघा किरपा आता करी
चिंब होऊ दे धरणी 
रान सार आबादानी जीव जळ खुळ्यावानी
देवा किरपा करी ....
धावत ये र काळ्या मेघा किरपा आता करी हा ...
हिरवळीच दान नेसलं रान भरला आज आल जी
मिरुगाच्या नादान केली पेरण जोमान बरसू दे पाणी
हे ...
काळ्या आईची करणी तिला लेकराची माया
माय होईल हिरवी गान हिरीतच गाया
वरती आभाळाची हाये मला बापावाणी छाया
साद माझ्या काळजाची न्हाई जायची र व्हाया
माझ्या जीव्हाराच सोन 
येऊ दे र अमदा छान घाली पदरात धान
देवा किरपा करी ..
धावत ये र काळ्या मेघा किरपा आता करी हा ..
बीज रुजल रुजल माउलीच्या उदरात
माझ शिव्हार आवार आज आल्या भरात
सात जन्माची पुण्याई घातली तू पदरात
माय भरल्या कुशीत कोडं हसते गालात
आल डोळ्यामंदी पाणी जीव झाला खुळ्यावानी
सारी तुझीच करणी देवा किरपा करी ..
धावत ये र काळ्या मेघा किरपा आता करी हा ...

0 comments:

Post a Comment