Title: | Tujhya Majhay Sansarala Aani Kaay Hava |
Singers: | Ajay-Atul, Hrushikesh Ranade, Yogita Godbole, Prajakta Ranade |
Music: | Ajay-Atul |
Lyrics: Song - Navari Aali गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी किंकिण कांकण रुणझून पैजण सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली नवऱ्यामुलाची आली हळद हि ओली हळद हि ओली लावा नवरीच्या गाली हळदीन नवरीच अंग सारं माखवा पिवळी करून तिला सासरी पाठवा सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी सासरच्या ओढीन हि हसते हळूच गाली ग पोरी नवरी आली सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली सासरी मिळूदे तुला माहेरची माया माहेरच्या मायेसंग सुखाची गा छाया भरुनिया आले डोळे जड जीव झाला जड जीव झाला लेक जाय सासराला आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी ग पोरी सुखाच्या सरी सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली | Guru Thakur |
0 comments:
Post a Comment