Lallati Bhandar ( Jogwa ) Marathi Movie Songs Lyric

Lallati Bhandar ( Jogwa ) 

Marathi Movie Songs Lyric 


मराठी ----


नदीच्या पल्याड 
आईचा डोंगर  
डोंगर माथ्याला  
देवीचे   मंदीर  
घालू  जागर जागर 
डोंगर माथ्याला 

लल्लाटी  भंडार  दूर 
लोटून  दे   अंधार 
आलो  दुरून रांगून डोंगर येण्गुन
उघड देवी दार

नदीच्या पाण्यावर ,अन्गीण फुटत 
तुझ्या नझरेच्या तालावर, काळीज डुलत 
नाद आला ग आला ग, जीवाच्या घुन्गाराला 

लल्लाटी  भंडार , दूर  लोटून  दे   अंधार 
आलो  दुरून रांगून डोंगर येण्गुन ,उघड देवी दार


नवसाला पाव तु, हाकाला धाव तु 
हाकाला धाव तु ,देवी माझ्या अंतरी रहाव तू
देवी माझ्या अंतरी रहाव तू ,
काम क्रोध अर्पुनी लाव तू ,
काम क्रोध मर्दुनी लाव तू,
 देवी माझी पार कर नाव तू 

डोळा भरून तुझी मुरत पाहीन 
मुरत पाहीन ,तुझा महिमा गाईन 
महिमा गाईन ,तुला घुगार्या वाहीन
घुगार्या  वाहीन, तुझ्या भंडारा खाईन 
दृस्त लागली लागली ,हळदीच्या अंगाला 

लल्लाटी  भंडार,  दूर  लोटून  दे   अंधार 
आलो  दुरून रांगून डोंगर येण्गुन, उघड देवी दार

यल्लमा देवीचा जागर ह्यो 
भक्ती चा सागर 
निविदाची भाकर हि दावती गा 
जमल्या ग लेकर 
पुनवेचा चांदवा 
देवीच्या मायेचा पाझर 
आईच्या मायेचा पाझर 
सागर ह्यो भक्तीचा सागर 

खाणा नारळाने ,तुझी ओटी मी भरीन 

ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन 
सेवा करीन, तुझ्या देव्हारा धारेन
देव्हारा धारेन 
माझी ओंजळ भरेन

आई सांभाळ सांभाळ 
कुशीत लेकराला
आई सांभाळ सांभाळ 
कुशीत लेकराला

लल्लाटी  भंडार  दूर  लोटून  दे   अंधार 
आलो  दुरून रांगून डोंगर येण्गुन उघड देवी दार

यल्लमा देवीचा जागर ह्यो 
भक्ती चा सागर 
निविदाची भाकर हि दावती गा 
जमल्या ग लेकर 
पुनवेचा चांदवा 
देवीच्या मायेचा पाझर 
आईच्या मायेचा पाझर 
सागर ह्यो भक्तीचा सागर 


1 comments:

Vaibhav said... [Reply]

one of the famous song

Post a Comment